1. प्रस्तावना:

  Si Creva कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. जी कंपनी ॲक्ट 2013 च्या तरतुदीच्या अन्वये स्थापित आहे. जिचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर CIN: U65923MH2015PTC266425 (“Si Creva” / “कंपनी”) आहे. Si Creva ही महत्वाची नॉन-डिपॉझिट घेणारी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. जिचा रजिस्ट्रेशन नंबर N-13.02129 असून मास्टर डायरेक्शन – नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी – प्रणालीगत स्वरूपात महत्त्वाची नॉन-डिपॉझिट घेणारी आणि डिपॉझिट घेणारी कंपनी (रिझर्व्ह बँक) दिशानिर्देश 2016 नुसार वेळोवेळी जारी केलेल्या ऑर्डर आणि अशा इतर नियम, नियमन, दिशानिर्देश, सर्क्युलर, नोटिफिकेशन आणि वेळोवेळी जारी केलेल्या ऑर्डर द्वारे रजिस्टर्ड आणि नियमन केले जाते. (“ RBI दिशानिर्देश”)

  आजमितीला Si Creva ही एक प्रणाली म्हणून महत्त्वपूर्ण NBFC बनली आहे. त्यामुळे तिच्या अनुपालन दायित्वाच्या कक्षा विस्तारित झाल्या आहेत.

  Si Creva ही कंझ्युमर आणि पर्सनल लोन प्रदान करण्याच्या बिझनेसमध्ये कार्यरत आहे.

 2. उद्देश आणि उद्दिष्ट:

  1. 2.1. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) 28 सप्टेंबर 2006 रोजीचे आपले नोटिफिकेशन नंबर DNBS (PD) CC नंबर 80/03.10.042/2005-06 आणि त्यानंतर अन्य विभिन्न नोटिफिकेशनच्या माध्यमातून फेअर प्रॅक्टिस कोडच्या संदर्भात विस्तृत मार्गदर्शक तत्वे निर्धारित केली आहेत. यामध्ये सर्व नॉन-बँकिंग फायनान्शियल्स कंपन्यांच्या (“NFBC”) संचालक मंडळाद्वारे अनुसरण करणे आणि पालन करणे आवश्यक आहे. हे सर्व 1 जुलै, 2015 रोजीच्या अंतिम मास्टर सर्क्युलर- फेअर प्रॅक्टिस कोड नोटिफिकेशन नंबर DNBR.(PD).CC.No.054/03.10.119/2015-16 मध्ये समावेशित करण्यात आले आहे. परिणामस्वरूप, Si Creva ने RBI मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप, हा सर्वसमावेशक फेअर प्रॅक्टिस कोड (“कोड”) तयार केला आहे. ज्याचा या डॉक्युमेंटमध्ये समावेश करण्यात आला आहे.
  2. 2.2. या कोडचे उद्दीष्ट अन्य बाबींसोबत कस्टमर्सला अशा पद्धतींची प्रभावी माहिती देणे आहे. ज्याचे पालन Si Creva द्वारे आपल्या कस्टमर्सला प्रदान करण्यात येणारी फायनान्शियल सुविधा आणि सर्व्हिसच्या संदर्भात केला जाईल. यासोबतच हा कोड कस्टमरला त्यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या आर्थिक सुविधा आणि सर्व्हिसेसच्या संदर्भात माहितीपूर्ण निर्णय घेण्याची सुविधा देखील देईल आणि हे Si Creva मंजूर आणि वितरण करू शकणाऱ्या कोणत्याही लोनवर लागू होईल.
  3. 2.3. हा कोड खालील उद्देशांसाठी निर्मित आहे: (अ) कस्टमर सोबत व्यवहार करण्यासाठी किमान मानकांचे पालन करून सुयोग्य, वाजवी आणि विश्वसनीय पद्धतींना प्रोत्साहन देणे; (ब)पारदर्शकतेला चालना देऊन कस्टमरला अशा पद्धतीने आश्वस्त करणे की त्यांच्याद्वारे सर्व्हिसच्या संदर्भात योग्य प्रकारे अपेक्षा करू शकतील.(क) कस्टमर आणि Si Creva यांदरम्यान योग्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देणे. (ड) Si Creva मध्ये कस्टमरचा आत्मविश्वास वाढवणे.
 3. प्रमुख वचनबद्धता आणि घोषणा:

  Si Creva आपल्या कस्टमर्स प्रती खालील वचनबद्धता दर्शविते:

  1. 3.1. Si Creva खालील माध्यमातून कस्टमर्स संबंधित त्यांच्या सर्व व्यवहारांमध्ये योग्यरित्या आणि वाजवीपणे कार्य करेल:

   1. 3.1.1. Si Creva द्वारे प्रदान करण्यात येणारे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस साठी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अनुपालन केली जाणारी प्रक्रिया आणि पद्धतींसाठी कोड मध्ये उल्लेखित वचनबद्दता आणि मानकांना पूर्ण करण्याद्वारे;
   2. 3.1.2. हे सुनिश्चित करण्याद्वारे की आमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस संबंधित कायदे आणि नियमनाच्या अनुसार आहे;
   3. 3.1.3. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेच्या नैतिक तत्त्वांवर कस्टमर्सशी व्यवहार करण्याद्वारे ;
   4. 3.1.4. व्यावसायिक, विनम्र आणि जलद सर्व्हिस प्रदान करण्याद्वारे;
   5. 3.1.5. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात अटी व शर्तीं; खर्च, हक्क आणि दायित्व यासंदर्भात वेळेवर आणि अचूक प्रकटीकरण करण्याद्वारे
  2. 3.2. आमचे फायनान्शियल प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस कसे काम करतात हे समजून घेण्यास Si Creva कस्टमरला सहाय्य करेल –
   1. 3.2.1. फायनान्शियल्स स्कीम आणि अन्य कम्युनिकेशनच्या बाबतीत मौखिक स्वरुपात आणि कर्जदाराला आकलन होईल अशा हिंदी आणि/किंवा इंग्रजी आणि/किंवा स्थानिक स्थानिक भाषेत कर्जदाराला समजावून सांगण्याद्वारे.;
   2. 3.2.2. आमचे जाहिरात आणि प्रचाराचे साहित्य सुस्पष्ट आहे आणि दिशाभूल करत नाही याची खात्री करण्याद्वारे;
   3. 3.2.3. ट्रान्झॅक्शनच्या आर्थिक परिणामांचे स्पष्टीकरण करण्याद्वारे;
   4. 3.2.4. कस्टमरला फायनान्शियल स्कीम निवडण्यास मदत करण्याद्वारे.
  3. 3.3. Si Creva चुकीच्या बाबींसह त्वरित आणि सक्रियपणे व्यवहार करेल:
   1. 3.3.1. चुकांची त्वरित दुरुस्ती करण्याद्वारे;
   2. 3.3.2. कंपनीने निर्धारित केल्यानुसार कस्टमर तक्रार निवारण यंत्रणेनुसार कस्टमरच्या तक्रारींवर त्वरित लक्ष देण्याद्वारे ;
   3. 3.3.3. जर कस्टमर अद्यापही आमच्या सहाय्याने समाधानी नसतील तर त्यांच्या तक्रारीवर पुढे कार्यवाही कशी करायची हे आमच्या कस्टमर्सला कळविण्याद्वारे;
   4. 3.3.4. आमच्या चुकीमुळे आम्ही लागू केलेले कोणतेही शुल्क परत करण्याद्वारे.
  4. 3.4. Si Creva द्वारे कोडची प्रसिद्धी केली जाईल. Si Creva च्या वेबसाईटवर इंग्रजीमध्ये आणि देशातील सर्व संभाव्य प्रमुख स्थानिक भाषा/ कर्जदाराला आकलन होतील अशा भाषांत प्रदर्शित करेल; विनंतीनुसार कस्टमर्स साठी कॉपी उपलब्ध असतील..
 4. लोन ॲप्लिकेशन्स आणि प्रक्रिया
  1. 4.1. कर्जदारांशी सर्व संवाद स्थानिक भाषा किंवा कर्जदाराला आकलन होईल अशा भाषेत केला जाईल.
  2. 4.2. Si Creva द्वारे पात्र अर्जदारांना क्रेडिट देऊ केले जाईल. जे त्यांच्या लोन विनंती पत्र किंवा लोन ॲप्लिकेशनच्या फॉर्मद्वारे लोन घेण्याची आवश्यकता व्यक्त करतील.
  3. 4.3. Si Creva द्वारे जारी केलेल्या लोन ॲप्लिकेशन मध्ये कर्जदाराच्या हितावर परिणाम करणाऱ्या आवश्यक माहितीचा समावेश असेल जेणेकरून इतर NFBC द्वारे ऑफर केलेल्या अटी व शर्तींशी अर्थपूर्ण तुलना करता येईल आणि कर्जदाराला माहितीपूर्ण निर्णय घेता येईल.
  4. 4.4. सर्व लोनच्या ॲप्लिकेशन्स साठी Si Creva पोचपावती पावती जारी करेल. सर्व आवश्यक डॉक्युमेंट आणि माहिती मिळण्याच्या अधीन राहून लोन ॲप्लिकेशन सर्व बाबतीत पूर्तता झाल्यानंतर ॲप्लिकेशन प्राप्त झाल्याच्या 30 (तीस) दिवसांच्या आत निकाली काढले जातील. कोणत्याही परिस्थितीत, कस्टमरला वेळोवेळी त्याच्या ॲप्लिकेशनच्या स्थितीसंदर्भात सेल्स पर्सन द्वारे सूचित केले जाईल. कस्टमर ॲप्लिकेशनच्या स्थितीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी विहित टोल-फ्री नंबर किंवा ईमेल आयडीवर Si Creva च्या कस्टमर सर्व्हिस टीमशी संपर्क साधू शकतात.
  5. 4.5. जर कोणतेही अतिरिक्त तपशील/डॉक्युमेंट आवश्यक असतील तर ते कर्जदारांना त्वरित सूचित केले जाईल.
  6. 4.6. Si Creva त्यांच्या कर्मचाऱ्यांद्वारे किंवा त्याद्वारे नियुक्त केलेल्या बिझनेस पार्टनरद्वारे कस्टमरच्या टेलिफोन नंबरशी संपर्क साधून/किंवा लोन ॲप्लिकेशनवर नमूद केलेल्या निवास/बिझनेस ॲड्रेसला प्रत्यक्षपणे भेट देऊन काँटॅक्ट पॉईंट व्हेरिफिकेशन आयोजित करेल.
  7. 4.7. कंपनी अर्जदाराला त्याच्या/तिच्या ॲप्लिकेशन नाकारण्याच्या कारणांची माहिती देईल.
 5. गैर-भेदभाव धोरण

  Si Creva हे लिंग, वंश किंवा धर्माच्या आधारावर Si Creva चे विद्यमान तसेच संभाव्य कस्टमर यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास सक्त मनाई करते.

 6. लोन मूल्यमापन आणि अटी/शर्ती

  1. 6.1. Si Creva द्वारे कर्जदाराच्या क्रेडिट पात्रते बाबत योग्य ती काळजी घेईल. ॲप्लिकेशन बाबत निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा मापदंड असेल.. मूल्यांकन हे Si Creva च्या क्रेडिट पॉलिसी, नियम आणि त्यासंबंधीच्या प्रक्रियेनुसार असेल.
  2. 6.2. कर्जदाराला मंजूरी पत्राद्वारे किंवा त्या संदर्भाने मंजूर लोन रक्कम ही हिंदी किंवा इंग्रजी किंवा कर्जदाराला समजल्याप्रमाणे स्थानिक भाषेत लिखित स्वरूपात कळविली जाईल. या पत्रात वार्षिक इंटरेस्ट रेट आणि त्यांच्या ॲप्लिकेशनची पद्धत यासह अटी व शर्ती असतील. Si Creva ही कर्जदाराकडून या अटी व शर्तींच्या स्वीकृतीची नोंद ठेवेल.
  3. 6.3. लोन मंजुरी/वितरणाच्या वेळी सर्व कर्जदारांना लोन डॉक्युमेंट्समध्ये नमूद केलेल्या सर्व संलग्नित प्रतीसह हिंदी किंवा इंग्रजी किंवा कर्जदाराला आकलन होईल अशा स्थानिक भाषेत (“लोन डॉक्युमेंट्स”) लोनच्या अटी व शर्ती असलेल्या लोन डॉक्युमेंट्सची प्रत सादर करण्यास Si Creva स्पष्टपणे बांधील असेल. सर्व कर्जदारांना दिलेले लोन डॉक्युमेंट्स आणि सर्व संलग्नित मध्ये अटी व शर्ती आणि इंटरेस्ट रेट नमूद असल्याची खात्री करेल. पुढे, लोन डॉक्युमेंटमध्ये ठळक स्वरुपात विलंबित पेमेंटसाठी आकारले जाणारा दंडात्मक इंटरेस्ट Si Creva नमूद करेल.
 7. अटी / शर्तींमधील बदलांसह लोनचे वितरण

  1. 7.1. Si Creva हे इंटरेस्ट रेट आणि प्रक्रिया आणि अन्य शुल्के अधिक नसतील याची खात्री करण्यासाठी आणि सुनिश्चित करण्यासाठी योग्य अंतर्गत तत्त्वे आणि प्रक्रियेची आखणी करतील. Si Creva लोन वितरणाच्या वेळी लोन आणि ॲडव्हान्स वेळी इंटरेस्ट रेट आणि प्रक्रिया आणि इतर शुल्क वरील संदर्भित अंतर्गत तत्त्वे आणि प्रक्रियांचे काटेकोरपणे पालन करत असल्याची खात्री करेल.
  2. 7.2. कर्जदाराद्वारे मंजूर केलेल्या सर्व अटी व शर्तींचे अनुपालन केल्यानंतर त्वरित वितरण केले जाईल. Si Creva कर्जदाराला स्थानिक भाषेत / कर्जदाराला आकलन होईल याप्रमाणे वितरण शेड्यूल, इंटरेस्ट रेट, सर्व्हिस शुल्क, प्री-पेमेंट शुल्क इत्यादींसह अटी व शर्तींमध्ये कोणत्याही बदलाची सूचना देईल. Si Creva सुनिश्चित करेल की इंटरेस्ट रेट आणि शुल्कातील बदल केवळ संभाव्यपणे प्रभावित झाले आहेत. या परिणामाची स्थिती लोन डॉक्युमेंट्समध्ये समाविष्ट केली जाईल.
 8. वितरणानंतरचे पर्यवेक्षण

  1. 8.1. लोन डॉक्युमेंट अंतर्गत पेमेंट किंवा परफॉर्मन्स रिकॉल/ॲक्सिलरेट करण्याचा कोणताही निर्णय लोन डॉक्युमेंटच्या अनुरूप असेल.
  2. 8.2. कर्जदाराने देऊ केलेली सर्व सिक्युरिटी सर्व देय रिपेमेंट केल्यावर किंवा लोनची थकित रक्कम प्राप्त झाल्यावर रिलीज केली जाईल, जे कर्जदाराच्या विरुद्ध अन्य कोणत्याही क्ले साठी कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या किंवा कार्यकक्षेच्या अधीन असेल. जर सेट-ऑफचा असा हक्क वापरण्याचा असेल तर कर्जदाराला उर्वरित क्लेम आणि संबंधित क्लेम सेटल/देय होईपर्यंत सिक्युरिटीज ठेवण्यास पात्र असलेल्या अटींविषयी संपूर्ण तपशिलासह सूचना दिली जाईल.
 9. इंटरेस्ट रेट आणि प्रक्रिया शुल्क

  1. 9.1. Si Creva इंटरेस्ट रेट आणि प्रक्रिया व अन्य शुल्क निश्चित करण्यासाठी (जर असल्यास) आणि वाजवी असल्याची सुनिश्चिती करण्यासाठी योग्य अंतर्गत तत्त्वे आणि कार्यपद्धतीची निर्मिती करेल. Si Creva लोन वितरणाच्या वेळी लोन आणि ॲडव्हान्स यांच्यावरील इंटरेस्ट रेट आणि इतर शुल्क, वरील संदर्भित अंतर्गत तत्त्वे आणि प्रक्रियांचे काटेकोरपणे पालन करत असल्याची खात्री करेल.
  2. 9.2. Si Creva द्वारे ॲप्लिकेशन फॉर्म/लोन ॲग्रीमेंटमध्ये कर्जदाराला इंटरेस्ट रेटचे प्रकटीकरण केले जाईल आणि मंजुरी पत्रात स्पष्टपणे कळवेल.
  3. 9.3. इंटरेस्ट रेटची विस्तृत श्रेणी आणि रिस्कच्या ग्रेडेशनचा दृष्टिकोन देखील साध्या प्रॉडक्टच्या बाबतीत Si Creva वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. वेबसाईटवर प्रकाशित किंवा अन्य ठिकाणी प्रकाशित केलेली माहिती जेव्हा इंटरेस्ट रेटमध्ये बदल होईल तेव्हा अपडेट केली जाईल.
  4. 9.4. इंटरेस्ट रेट वार्षिक रेट असेल जेणेकरून कर्जदाराला अकाउंटवर आकारल्या जाणाऱ्या अचूक रेटची माहिती असेल.
  5. 9.5. लोन आणि ॲडव्हान्ससाठी आकारले जाणारे इंटरेस्ट रेट निर्धारित करण्यासाठी फंड, मार्जिन आणि रिस्क प्रीमियमचा खर्च लक्षात घेणारे इंटरेस्ट रेट मॉडेल Si Creva द्वारे निर्धारित केले जाईल.
  6. 9.6. इंटरेस्ट रेटची आकारणी ही कर्जदाराच्या रिस्कच्या ग्रेडेशनवर अवलंबून असते; ज्यामध्ये बिझनेसचे आर्थिक सामर्थ्य, बिझनेसवर परिणाम करणारे रेग्युलेशनचे नियमन,स्पर्धा, कर्जदाराचे मागील रेकॉर्ड इ बाबींचा अंतर्भाव होतो.
  7. 9.7. प्रक्रिया शुल्क (जर असल्यास) हे क्रेडिट मूल्यांकन, डॉक्युमेंटची व्याप्ती आणि ट्रान्झॅक्शन दरम्यान समाविष्ट अन्य खर्चांच्या आधारावर निश्चित केले जाईल. इंटरेस्ट रेट बदलाच्या अधीन आहे. कारण मार्केट अनिवार्यता आणि रेग्युलेटरी नियमांमध्ये बदलांमुळे परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो आणि केस-टू-केस आधारावर मॅनेजमेंटच्या विवेकबुद्धीच्या अधीन आहे.
  8. 9.8. कंपनी कर्जदारांना खर्च रहित ऑनलाईन रिपेमेंट गेटवे प्रदान करेल.
 10. सर्वसाधारण

  1. 10.1. कर्जदाराने पूर्वी उघड न केलेली नवीन माहिती Si Creva च्या निदर्शनास आल्याशिवाय Si Creva कर्जदाराशी केलेल्या लोन अ‍ॅग्रीमेंट मध्ये प्रदान केलेल्या उद्देशांशिवाय कर्जदाराच्या व्यवहारात हस्तक्षेप करणार नाही.
  2. 10.2. लोन वसुलीच्या बाबतीत Si Creva कर्जदारांना अवेळी त्रास देणे/लोनच्या वसुलीसाठी बळाचा वापर करणे यासारख्या अनावश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करणार नाही.
  3. 10.3. Si Creva सुनिश्चित करेल की त्याची सुरक्षा, मूल्यांकन आणि त्याची प्राप्ती निष्पक्ष आणि पारदर्शक आहे.
  4. 10.4. Si Creva सुनिश्चित करेल की कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने कस्टमर सोबत व्यवहार करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित केले जाईल.
  5. 10.5. कर्जदाराच्या अकाउंटच्या ट्रान्सफरसाठी कर्जदाराकडून विनंती प्राप्त झाल्यास, संमती किंवा अन्यथा Si Creva चा आक्षेप (जर असल्यास) अशी विनंती प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 21 (एकवीस) दिवसांच्या आत सांगितली जाईल. असे ट्रान्सफर कायद्यानुसार पारदर्शक करारात्मक अटींनुसार असेल.
 11. कस्टमर तक्रार निवारण यंत्रणा

  कस्टमर तक्रार निवारण यंत्रणा (“निवारण धोरण”) बोर्डाद्वारे स्वीकारण्यात आली आहे आणि सर्व कर्जदारांच्या टच पॉईंट्स/हेड ऑफिस आणि Si Creva च्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यासाठी तयार केली गेली आहे. ज्यामुळे कस्टमरला एस्केलेशन यंत्रणा आणि तक्रार निवारण अधिकाऱ्याविषयी (नाव आणि संपर्क तपशीलांसह) कळविण्यात येते.

 12. या कोडचा नियमित अंतराने आढावा आणि व्यवस्थापनाच्या विविध स्तरांवरील तक्रार निवारण यंत्रणेच्या कार्याचा आढावा Si Creva द्वारे घेतला जाईल आणि अशा पुनरावलोकनांचा एकत्रित अहवाल नियमित अंतराने कंपनीच्या संचालक मंडळाला सादर केला जाईल.

Si Creva द्वारे कोडच्या आशयानुसार आणि त्याच्या बिझनेसला लागू होईल अशा पद्धतीने या कोडचे पालन केले जाईल.